मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:48 PM2020-05-12T17:48:00+5:302020-05-12T17:48:07+5:30

पंधरा नगरसेवकनी ११ मे  रोजी जिल्हाधिकारी वाशिम  यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव  दाखल  केला  .

Manora Nagar Panchayat: No-confidence motion filed against the mayor | मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल

मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा :  मानोरा नगर पंचायतच्या  नगराध्यक्षा बरखा अलताब बेग यांच्यावर नगरपंचायतच्या पंधरा नगरसेवकनी ११ मे  रोजी जिल्हाधिकारी वाशिम  यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव  दाखल  केला  . यासंदर्भात लोकमतच्यावतीने ‘नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली’ यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.
मानोरा  नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा बेग यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास मध्ये  नगराध्यक्षा नगरसेवकांना विश्वासात घेत नाही , विकास कामे करत नाही विकासामध्ये अडचणी निर्माण  करतात, नगर पंचायतची सभेची वेळ व माहीती न देता परस्पर ठरवितात , शासकीय  योजनेचा लाभ जवळच्या लोकाना देतात  अशा वेगगळ्या  कारणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला .
मानोरा नगर पंचायतवर सर्व  पक्षीय नगरविकास आघाडीची सत्ता आहे . विद्यमान नगराध्यक्षा  ह्या याच आघाडीच्या नगराध्या म्हणुन आॅगष्ट १८ मध्ये विराजमान  झाल्या होत्या  , परंतु  सर्वक्षीय आघाडीच्या नगरसेवकांना विकास कामात विश्वासात घेत नसल्यामुळे  नगरसेवक त्यांच्या विरोधात  उभे ठाकले.  मानोरा नगरपंचायतची सदस्या संख्या सतरा आहे. त्या पैकी पंधरा नगरसेवक त्यांच्या  विरोधात गेले आहे . नगराध्यक्षांवर टाकण्यात आलेल्या   अविश्वास प्रस्तावावर नगरसेवक अमोल प्रकाश राऊत, रेखाताई श्यामराव  पाचडे ,  छाया गुणवंत डाखोरे , शेख फिरोजाबी शेख मुस्ताक  , ,  शेख आबेदाबी नाजीम,  सुनेहरा परविन वहिदोदीन शेख, सुनिता  संतोष भोयर , ऊषाताई शेरसिंग जाधव , शेख वहीद शेख अयुब , एहफाज शहा मेहबुब शहा , ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर,  मंजुषा महेश निशाने, हसिनाबी जब्बार शहा , अहमद बेग चांद बेग , गणेश परशराम भोरकडे आदीच्या स्वाक्षरी आहेत.  मानोरा नगराध्यक्षपद हे एससी प्रवगार्साठी राखीव असून या घडामोळीमुळे नगरपंचायत चर्चेत आली आहे.


 नगरसेवकांच्या  खोट्या कामाना मंजुरी  न दिल्यामुळे  माझ्याविरूध्द अविश्वासाचे कारस्थान रचल्या जात आहे . मी कोणाच्या हातची कटपुतली न व्हता सामर्थ्य पणे नगराध्यक्ष पदाचा कारभार संभाळत आहे.
- बरखा अलताब  बेग, नगराध्यक्षा मानोरा

Web Title: Manora Nagar Panchayat: No-confidence motion filed against the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.