शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:04 IST

कर्जमाफी पुरेशी नसल्याची जाहीर कबुली देत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाना साधला.

वाशिम : सरकारने दिलेली कर्जमाफी अपूर्ण असल्याचा उल्लेख युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा संदेश यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी केला होता. निवडणूक प्रचारादरम्यान सोमवारी रिसोड येथील सभेत कर्जमाफी पुरेशी नसल्याची जाहीर कबुली देत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाना साधला. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात असल्याचे सांगतानाच कर्जमाफी नव्हे, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मतांचा जोगवाही त्यांनी यावेळी मागितला.शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरीया, शिवसेना उमेदवार विश्वनाथ सानप, डॉ. चंद्रशेखर देशमुख यांच्यासह महायुतीमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आघाडी शासनाच्या १५ वर्षाच्या काळात वाशिमसह राज्यात कोणताही विकास झाला नाही. सध्या विरोधी पक्ष हा झोपलेल्या अवस्थेत असून, महायुतीच्या एकजूटीमुळे विरोधक हे दिसेनासे झाले आहेत. शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली असून, राज्य सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीचा लाभ हा सर्व शेतकºयांना मिळाला नसल्याचा पुनरूच्चार केला. शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी मतांचा जोगवाही त्यांनी यावेळी मागितला.शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील कुणी निवडणूक लढविली नाही. पहिल्यांदा माझ्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात असल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे आदित्य यांनी सांगितले. रिसोड मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात द्या, या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी मी स्वत: घेतो, असे सांगून महायुतीतील बंडखोर उमेदवारांचा समाचार घेतला. प्रास्ताविक विश्वनाथ सानप यांनी केले. तिकिट ‘मॅनेज’ झाल्याची केवळ चर्चाच - गवळीरिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तिकिट ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा, अफवा मध्यंतरी उडाली होती. शिवसेनेचे तिकिट हे शिवसेना पक्ष प्रमुख निश्चित करीत असून, असे कोणतेही तिकिट मॅनेज होत नसल्याचे खासदार भावना गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपा पदाधिकाºयांची अनुपस्थितीभाजपा, शिवसेना महायुती असली तरी वाशिम जिल्ह्यात भाजपातर्फे कारंजा व वाशिम येथे आयोजित जाहिर सभेत शिवसेना पदाधिकाºयांनी हजेरी न लावल्याची बाब भाजपा पदाधिकाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे रिसोड येथील युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला भाजपा पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार की नाही याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून होते. भाजयुमो जिल्हाध्यक्ष व अन्य काही कार्यकर्त्यांचा अपवाद वगळता भाजपाचे माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या सभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमधील कटुतेची दरी वाढल्याची चर्चा सभास्थळी ऐकायला मिळाली. बंडखोरांवर साधला निशानामहायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे सांगून बंडखोरांना थारा देऊ नका, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने आणि या उमेदवारांच्या पाठिशी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी असल्याने आदित्य यांचा हा इशारा नेमका कुणासाठी? अशी चर्चा सभास्थळी रंगली होती. 

टॅग्स :washimवाशिमAaditya Thackerayआदित्य ठाकरेrisod-acरिसोडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019