शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

कमळ फुलले, पंजा कायम तर घड्याळ बंद

By admin | Updated: October 23, 2014 00:58 IST

विश्लेषण विधानसभा निवडणुकीचे, वाशिम जिल्ह्यात रुजतोय भारिपचा अकोला पॅटन.

वाशिम : यंदाच्या विधानसभा निवडणुकीने सर्वांचेच अंदाज चुकवित सत्तेची फळे चाखणार्‍यांवर आत्मचिंतनाची वेळ आणली आहे. जिल्ह्यात भाजपाचे कमळ दोन ठिकाणी फुलले असून पंजाचा हात कायमच आहे तर राकाँची घड्याळ बंद पडली. याऊलट भारिप- बमसंचा अकोला पॅटर्न वाशिम जिल्ह्यातही रुजत असल्यावर मताच्या आकडेवारीने शि क्कामोर्तब केले आहे. सेनेच्या धनुष्यबाणाचा निशाणा तिनही मतदारसंघात चुकला आहे तर मनसेचे इंजिन रुळावरच थांबले. आघाडी आणि युतीचा घटस्फोट झाल्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत नऊ लाख चार हजार ८८३ पैकी पाच लाख ५२ हजार २३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. जिल्ह्यातील कारंजा व वाशिम भाजपाच्या ताब्यात तर रिसोडवर काँग्रेसचा ताबा कायम राहिला. भाजपाला वाशिममधून ४८ हजार १९६, रिसोड ५४ हजार २३१ तर कारंजा मतदारसंघातून ४४ हजार ७५१ अशी एकूण एक लाख ४४ हजार १७८ मतदारांनी पसंती दिली आहे. काँग्रेसला वाशिममधून ३५९३८, कारंजा ३0१0 तर रिसोडमधून ७0९३९ अशी एकूण एक लाख नऊ हजार ९१७ मतदान झाले आहे. साधारणत: काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असायचा. मात्र, विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील भारिप-बमसं पॅटर्नच्या झंझावाताने इतर पक्षांना मागे टाकून वाशिम जिल्ह्यातही तिसर्‍या क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच सतर्कतेचा इशारा दिला आहे. चवथ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाला मतदारांनी पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला शेवटच्या क्रमांकावर आली आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाचे अधिकाधिक वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेना, भार तीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा क्रमांक लागतो. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्या तरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी लाटेपुढे म ताधिक्क टिकविणेही शक्य झाले नाही.