शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकीतील बनावट नोटांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर

By admin | Updated: October 10, 2014 00:53 IST

विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बनावट नोटा चलनात आणण्याचाही प्रयत्न.

वाशिम : गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये वोट फॉर नोट चा सर्रास वापर करण्यात येतो. यातूनच बनावट नोटा चलनात आणण्याचाही प्रयत्न होतो. नेमकी हीच बाब हेरून जिल्हा पोलीस यंत्रणा व निवडणूक विभागाने गुप्त यंत्रणा कामाला लावून बनावट नोटा चलनात येत तर नाहीत ना यावर करडी नजर ठेवली असल्याची माहिती हाती आली आहे. आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर आघाडीत बिघाडी झाल्यानंतर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसही स्वबळ आजमावित निवडणुकीत दोन हात करण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.प्रमुख राजकीय पक्षांकडून होणार्‍या मतविभाजनाचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारिप बहुजन महासंघानेही कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावत मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहे. यातूनच ह्यवोट फॉर नोटह्ण सूत्र जन्माला आले आहे. मतदारांना होणारी पैशांची वाटप लक्षात घेता बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेटदेखील सक्रिय झाले आहे.निवडणुकीची संधी साधत या रॅकेटकडून बनावट नोटा चलनात आणल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.निवडणूक काळातील उमेदवारांच्या मागील कार्यकर्त्यांचा ताफा, नेते व पदाधिकार्‍यांची व्यवस्था, प्रतीदिन होणार्‍या जेवणावळी आणि प्रचारावर होणारा खर्च लक्षात घेता निवडणूक ही सर्वसामान्य आणि गोरगरिबांची राहिली नाही. राजकारणात लक्ष्मीपुत्रांचा सहभाग वाढला आहे. उमेदवार विजयी झाल्यानंतर पुढची पाच वर्षे मतदारसंघात चेहराच दाखवित नसल्याने अनेक ठिकाणी मतदारांची पैसे घेऊन मतदान करण्याची प्रवृत्ती वाढतच आहे. हा धोका लक्षात घेत काही उमेदवार बनावट नोटा चलनात आणणार्‍या टोळीशी संधान तर साधत नाहीत ना, या दिशेने पोलिसांकडून गोपनीय माहिती काढणे सुरू आहे.