कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 03:27 PM2019-01-29T15:27:22+5:302019-01-29T15:27:48+5:30

वाशिम : कुंभार समाजातील व्यक्तीला विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यासाठी दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीकरीता स्वामित्वधन माफ केलेले आहे.

The list of people working for pottery will be ready! | कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार होणार !

कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार होणार !

googlenewsNext

वाशिम : कुंभार समाजातील व्यक्तीला विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यासाठी दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीकरीता स्वामित्वधन माफ केलेले आहे. या निर्णयाची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तहसिलस्तरावर कुंभार समाजातील परंपरात व्यवसाय करणाºया व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करण्याच्या सूचना महसूल विभागाने २१ जानेवारीला राज्यातील जिल्हाधिकाºयांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अंमलबजावणी केली जाणार आहे.
शासनाने कुंभार समाजाच्या व्यक्तींना विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यास दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीसाठी स्वामित्वधन माफ केलेले आहे. तरीही कुंभार समाजाच्या व्यक्तीकडे स्वामित्वधन भरण्यासाठी क्षेत्रीय अधिकाºयांकडून आग्रह धरला जातो, अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. ५०० ब्रासपर्यंत मोफत माती देण्याच्या निर्णयासंदर्भात संपूर्ण राज्यात एकसुत्रता यावी याकरीता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेतील पदाधिकाºयांनी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने महसूल विभागाने २१ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना सूचना देत कुंभार समाजातील पात्र व्यक्तींना ५०० ब्रासपर्यंत माती देण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजाावणी करावी, अशा सूचना दिल्या. प्रत्येक तहसिलदाराने तलाठी व मंडळ अधिकाºयांमार्फत सर्वेक्षण करून परंपरागत कुंभार व्यवसाय करणाºया कुंभार समाजातील व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करावी. सदर यादी तयार करताना जातीचे दाखले असलेल्या व्यक्तींची व जातीचे दाखले नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करावी. तालुक्यातील पिढीजात व्यवसाय करणाºया कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत, अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र शिबिर आयोजित करून सक्षम प्राधिकाºयांकडून जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना महसूल विभागाने दिलेल्या आहेत. संबंधित लाभार्थीला अर्जासोबत जातीचा दाखला, तलाठी व मंडळ अधिकारी यांचा सदर व्यक्ती पारंपारिक कुंभार समाजाचा व्यवसाय करीत असल्याचा अहवाल आदी कागदपत्रे तहसिल कार्यालयास सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर ५०० ब्रासपर्यंत माती देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.


कुंभार समाजातील व्यक्तीला विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यासाठी दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीकरीता स्वामित्वधन माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून वाशिम जिल्ह्यात शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- दीपक कुमार मीना
प्रभारी जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: The list of people working for pottery will be ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम