शिरपूर जैन (वाशिम)- ब्राह्मणवाडा येथील ७५ वर्षीय गिताबाई गोविंदा घुगे या आजीबार्इंनी घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू केले असून, शौचालयाचा दरवाजा खरेदी करण्यासाठी गुरूवारी मालेगाव गाठले. मुले घरी नसल्याने आजीबाई स्वत: मालेगावात आल्या आणि बसस्थानक परिसरातील एका दुकानातून दरवाजा खरेदी केला. हा दरवाजा डोक्यावर घेऊन आजीबाई ५०० मीटर अंतरापर्यंत पायदळ जात आॅटो स्टॅण्डजवळ गेल्या. आॅटोमधून दुपारी त्या ब्राह्मणवाडा गावाकडे रवाना झाल्या.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}