वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:02 IST2017-12-24T21:02:34+5:302017-12-24T21:02:52+5:30
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर्वेक्षण झाले असून, येत्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर्वेक्षण झाले असून, येत्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.
यावर्षी शेतक-यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बोंडअळीने हल्ला चढवून कापूस उत्पादक शेतक-यांच्या नाकीनऊ आणले. राज्य सरकारने सुरूवातीला बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे (सर्वेक्षण) करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या अनुषंगाने आता सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभाग कामाला लागला आहे. यावर्षी जिल्ह्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा या भागात प्रामुख्याने बोंडअळीने कहर माजविल्याने कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले़ शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाकडून आता मदत दिली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी तालुकानिहाय कृषी साहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक अशा तीन कर्मचाºयांची चमू तयार करण्यात आली असून बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ७० टक्के सर्वेक्षण आटोपले असून, येत्या आठवड्यात उर्वरीत सर्वेक्षण पुर्णत्वाकडे जाईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.