समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:37 AM2021-06-15T11:37:47+5:302021-06-15T11:37:54+5:30

Samrudhi Highway News: भरपाई देण्याची मागणी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटना समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केली.

Land loss due to construction of Samrudhi Highway; When to pay? | समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाई केव्हा?

समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाई केव्हा?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील समृद्धी महामार्ग बांधकामाने बाधित शेतजमिनी, जलस्रोत, पांदण रस्ते आदींची नुकसानभरपाई द्यावी, तसेच युद्धस्तरावर जलस्रोत, पांदण रस्ते मोकळे करून नुकसानभरपाई द्यावी यासह इतर मागण्यांसाठी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे १३ जूनला भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी ना. फडणवीस यांनी संपूर्ण समस्या जाणून घेत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना ‘एमएसआरडीसी’चे प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांना दिल्या.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग बांधकामात पर्यावरणाचे, तसेच समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या गावाच्या जंगल, शेतशिवार, भौगोलिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आवश्यकता नसलेल्या असंख्य पुरातन वृक्षाची तोड झाली. असंख्य प्रमाणामध्ये जलस्रोत बाधित करण्यात आले. नदी, नाले, ओढे बांधकामाकरिता केलेल्या पक्क्या आणि कच्चा रस्त्यांच्या बांधणीमुळे जलस्रोत बाधित झाले आहे. प्रवाह बदलले आहे. यामुळे शेतजमिनीतील मृदता नष्ट झाली आहे. ११ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसाने शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटना समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केली.

Web Title: Land loss due to construction of Samrudhi Highway; When to pay?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.