‘कोथिंबीर’चे भाव गडगडले; शेतकरी संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:33 IST2020-12-21T18:33:18+5:302020-12-21T18:33:24+5:30
‘कोथिंबीर’चे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

‘कोथिंबीर’चे भाव गडगडले; शेतकरी संकटात !
शिरपूर जैन : यावर्षी शेतकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, सध्या ‘कोथिंबीर’चे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिरपूर येथील हर्रासीत केवळ ३० रुपयात ४ कॅरेट सांभारची सोमवारी विक्री झाली.
एका मागून एक कोसळणाºया संकटांपुढे यंदा शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येते. सुरूवातीला मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. एप्रिल, मे, जून या महिन्यात बाजारपेठ ठप्प असल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर खरीप हंगामात पावसातील अनियमितता, परतीचा पाऊस यामुळे उत्पादनात प्रचंड घट आली. सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमालाची प्रतवारी घसरल्याने अनेक शेतकºयांना अल्प भावात शेतमालाची विक्री करावी लागली. शिरपूर परिसरात अनेक शेतकरी भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन घेत आहेत. अलिकडच्या काळात भाजीपाल्याचे भाव प्रचंड गडगडले आहेत. शिरपूर येथे सोमवारी हर्रासीत कोथिंबिरच्या चार कॅरेटची विक्री केवळ ३० रुपयात झाल्याने लागवड व मशागत खर्चही निघत असल्याने शेतकºयांसमोर नव्याने संकट उभे ठाकले आहे.