रिसोड तालुक्यातील चिखली गावाला दुसऱ्यांदा आमदारकीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:42 PM2020-12-06T12:42:28+5:302020-12-06T12:49:19+5:30

Kiran Sarnaike News अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्या रूपाने रिसोड तालुक्यातील चिखली गावाला दुसऱ्यांदा आमदारकीचा सन्मान प्राप्त झाला आहे.

Kiran Sarnaike : Chikhali village in Risod taluka honored as MLA for the second time | रिसोड तालुक्यातील चिखली गावाला दुसऱ्यांदा आमदारकीचा सन्मान

रिसोड तालुक्यातील चिखली गावाला दुसऱ्यांदा आमदारकीचा सन्मान

googlenewsNext
ठळक मुद्दे स्व. मालतीताई सरनाईक यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड झाली होती. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात विजयश्री खेचून आणणाऱ्या अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्या रूपाने रिसोड तालुक्यातील चिखली गावाला दुसऱ्यांदा आमदारकीचा सन्मान प्राप्त झाला आहे. यापूर्वी त्यांच्या मातोश्री स्व. मालतीताई सरनाईक या आमदार म्हणून राहिल्या आहेत. 
जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या चिखली सरनाईक येथील स्व. अ‍ॅड. रामराव सरनाईक हे अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. गांधी घराण्याशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या पत्नी स्व. मालतीताई सरनाईक यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड झाली होती. त्यांचे पुत्र अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनीदेखील कॉंग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून कार्य केले. १९८८ मध्ये ते अकोला जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्षही होते. दरम्यान, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. या विजयामुळे चिखली गावात दुसऱ्यांदा आमदारकी आली आहे. गावचा सुपुत्र आमदार झाल्याने चिखली येथे शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाशिम येथेही शनिवारी विजयी रॅली काढण्यात आली.

Web Title: Kiran Sarnaike : Chikhali village in Risod taluka honored as MLA for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.