होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

By दिनेश पठाडे | Published: March 12, 2024 05:33 PM2024-03-12T17:33:27+5:302024-03-12T17:33:34+5:30

यापूर्वी अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरून धावत असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू होती तर लालगढ-काचीगुडा ३० जानेवारीपर्यंत नियोजित होती.

Kachiguda-Lalgarh special train will run on the occasion of Holi | होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

वाशिम : होळी सणानिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने वाशिममार्गे काचीगुडा-लालगढ-काचीगुडा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेच्या अप-डाऊनच्या प्रत्येकी तीन फेऱ्या होणार आहेत.

यापूर्वी अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरून धावत असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू होती तर लालगढ-काचीगुडा ३० जानेवारीपर्यंत नियोजित होती. त्यानंतर या रेल्वेला मुदतवाढ न मिळाल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात होती. ही रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना, व्यापारी व नागरिकांतून केली जात होती. अखेर वाढती मागणी आणि होळी सणानिमित्त काचीगुडा-लालगढ-काचीगुडा ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गाडी क्रमांक ०७०५३ काचीगुडा-लालगढ १६ मार्च ते ३० मार्चपर्यंत दर शनिवारी काचीगुडा येथून रात्री साडेनऊ वाजता सुटून वाशिम रेल्वे स्थानकावर सकाळी ७ वाजता पोहचून सोमवारी लालगढ येथे दुपारी १३:३५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७०५४ लालगढ-काचीगुडा दर मंगळवारी प्रस्थान रात्री १९:४५ स्थानकावरून होईल. वाशिम येथे दुसऱ्या दिवशी रात्री २२:२८ वाजता पोहचून काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९:४० वाजता पोहचेल. ही रेल्वे कामारेड्डी, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूरमार्गे धावेल.

Web Title: Kachiguda-Lalgarh special train will run on the occasion of Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.