जीपने दुचाकीस्वारास उडविले

By Admin | Updated: May 31, 2017 19:54 IST2017-05-31T19:54:31+5:302017-05-31T19:54:31+5:30

मानोरा : क्रूझर जीपने दुचाकीस्वारास उडविल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगव्हाण गावाजवळ घडली. यमाध्ये दुचाकीस्वार चव्हाण यांना जबर मार लागला.

Jeep jumped a two-wheeler | जीपने दुचाकीस्वारास उडविले

जीपने दुचाकीस्वारास उडविले

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : क्रूझर जीपने दुचाकीस्वारास उडविल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगव्हाण गावाजवळ घडली. यमाध्ये दुचाकीस्वार चव्हाण यांना जबर मार लागला. 
हळदा येथील चव्हाण हे एमएच ३७ डी ५३५६ क्रमांकाच्या दुचाकीने मानोरा येथे बाजारासाठी येत होते तर मानोरा येथून क्रुझर जीप मंगरुळपीरकडे भरधाव जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रुझरने या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये चव्हाण यांच्या हात व एका पायाला जबर दुखापत झाली तसेच छातीलादेखील इजा झाली. पुढील उपचारार्थ त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आली. याप्रकरणी मानोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Jeep jumped a two-wheeler