विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

By संतोष वानखडे | Updated: July 13, 2023 20:08 IST2023-07-13T20:08:08+5:302023-07-13T20:08:16+5:30

बसस्थानक, सिव्हिल लाईन, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जनआक्रोश मोर्चा धडकला.

Janakrosh Morcha of Vanchit Bahujan Aghadi for various demands | विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

संतोष वानखडे, वाशिम : पोलिस कोठडीतील मारहाणीत मृत्यूसंबंधी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बोराळा येथील विश्वास कांबळे यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यांसह प्रमुख ९ मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. महिला आघाडी महासचिव तथा वाशिम जिल्हा प्रभारी अरुंधतीताई सिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी डॉ. गजाला खान, प्रदेश सदस्या महिला आघाडी किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतिताई इंगळे, रिसोड विधानसभा समन्वयक परितोष इंगोले, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, सुभाषराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

बसस्थानक, सिव्हिल लाईन, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जनआक्रोश मोर्चा धडकला. यावेळी परळी येथील पोलीस कस्टडीत युवकाच्या मृत्यू संबंधी संबंधित दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बोराळा येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता विश्वास कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अनु. जाती, जमाती, मुस्लिम समुदायातील युवकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, आळंदी येथे वारकरी संप्रदायावर लाठीचार्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सेवेमधून बडतर्फ करावे, काटा येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावी, संपूर्ण महाराष्ट्रातील गायरान, अतिक्रमण जमिनीचे पट्टे व गावातील घरांची नोंद करूनरमाई आवास योजनेमधून घरकुल द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Janakrosh Morcha of Vanchit Bahujan Aghadi for various demands