संपूर्ण कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याचा मुद्दा पोहोचला विधान परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 15:36 IST2019-06-22T15:36:06+5:302019-06-22T15:36:20+5:30
वाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला.

संपूर्ण कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याचा मुद्दा पोहोचला विधान परिषदेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. २१ जून रोजी याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.
सन २०१६ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी राज्यशासनाने शेतकरी कर्जमाफीचा शुभारंभ केला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य शेतकऱ्यांसोबतच जिल्ह्यातील जांभरुण येथील शेतकरी अशोक मनवर यांना १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले. प्रत्यक्षात मात्र ७७ हजार ४३७ रुपयांचीच कर्जमाफी झाली असून ४ जून रोजी कर्ज मागायला बँकेत गेलेल्या मनवर यांच्याकडेच बँकेने ७० हजार ३२० रुपयांचे कर्ज बाकी असल्याचे सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मनवर यांची भेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मुंडे यांच्याशी घालून दिल्यानंतर मुंडे यांनी यासंदर्भात २१ जून रोजी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.