मोकाट जनावरांमुळे अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:23+5:302021-09-05T04:48:23+5:30

मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश ...

Invitation to an accident due to stray animals | मोकाट जनावरांमुळे अपघातास आमंत्रण

मोकाट जनावरांमुळे अपघातास आमंत्रण

मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात जुने बस स्टँड ते अकोला फाटा जुने बस स्टँड ते शेलू फाटा जोगदंड हॉस्पिटल ते गांधी चौक गांधी चौक ते शिव चौक आठवडी बाजार ते तहसील रोड रस्त्यावर ठिकठिकाणी जनावराचे कळप दिसून येतात. दुभाजकांवर उभे राहणे, दुभाजकांनाच रेटून बसणे,रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात. शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यातच अतिक्रमणही वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. मोकाट जनावरांचा नगरपंचायतने तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे

040921\img-20210904-wa0045.jpg

मोकाट जनावरे

Web Title: Invitation to an accident due to stray animals