शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी व आठवी वर्ग जोडल्याच्या प्रक्रियेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:15 IST

कुठलीही अट न पाळता सरसकट इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात आल्यामुळे खाजगी शाळांवरील शिक्षक बांधवांच्या सेवांवर आरिष्टय आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग जोडण्यात आले आहेत. ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली की नाही, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) ५ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे दिले असून, याचा अहवाल येत्या १२ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची सुचनाही केली आहे.अमरावती विभागातील जिल्हा परिषद शाळांना अंतराची कुठलीही अट न पाळता सरसकट इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात आल्यामुळे खाजगी शाळांवरील शिक्षक बांधवांच्या सेवांवर आरिष्टय आले असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्ग ५ व ८ मध्ये केवळ ५-७ विद्यार्थी असतानाही तसेच गणित व शिक्षक तसेच प्रयोगशाळा व्यवस्था नसतानाही वर्ग सुरु आहेत. परिणामी गरीब व बहुजन विद्यार्थ्यावर त्याच्या शैक्षणीक गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी तक्रार शिक्षक संघाच्या अमरावती विभागाचे संस्थापक शेखर भोयर यांनी १९ सप्टेंबर आणि ११ आॅक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करतानाच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेत विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या सीईओंना या संदर्भात पत्र पाठवून या प्रकारची चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ७ दिवसांत अर्थात १२ डिसेंबरपर्यंत विभागीय आयुक्तालयाकडे सादर करण्याची सुचनाही केली आहे.   विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सुचना केल्या आहेत. तथापि, वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्याची प्रक्रियाच पार पाडण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचा प्रश्नच आमच्यासाठी उद्भवत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.-गजाननराव डाबेरावप्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र