हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:38 IST2019-08-12T17:38:35+5:302019-08-12T17:38:40+5:30

क्रिकेट खेळण्याच्या वादावरून झालेल्या भांडणात शे. साबीर शे. शब्बीर (वय २१ वर्षे) या युवकास तीघांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केली.

Injured youth dies during treatment | हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू!

हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : क्रिकेट खेळण्याच्या वादावरून तीघांनी एका युवकास बेदम मारहाण करून केल्याची घटना १० आॅगस्ट रोजी शहरातील गोपाल टॉकीजनजिक असलेल्या गड्डीपुरा परिसरात घडली. या घटनेतील गंभीर जखमी युवकाचा १२ आॅगस्ट रोजी अकोला येथील दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळण्याच्या वादावरून झालेल्या भांडणात शे. साबीर शे. शब्बीर (वय २१ वर्षे) या युवकास शे. समीर शे. मिर्झा, अ. असलम अ. जलील, फराज मिर्झा या तीघांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या घटनेत शे. साबीर हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा १२ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ शे. समीर शे. शब्बीर याने शहर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून आधी भादंविचे कलम ३२६, ३४ नुसार आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ११ आॅगस्टला त्यात कलम ३०७ ने वाढ करण्यात आली होती. घटनेचा पुढील तपास वाशिम पोलिस करित आहे.

Web Title: Injured youth dies during treatment