कपाशीवर ‘पॅराविल्ट’ रोगाचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: October 1, 2014 00:51 IST2014-10-01T00:45:48+5:302014-10-01T00:51:10+5:30

पश्‍चिम व-हाडात २३ हजार हेक्टरवरील पीक धोक्यात.

Influence of paravilt disease on cotton | कपाशीवर ‘पॅराविल्ट’ रोगाचा प्रादुर्भाव

कपाशीवर ‘पॅराविल्ट’ रोगाचा प्रादुर्भाव

ब्रम्हानंद जाधव / मेहकर
पश्‍चिम वर्‍हाडात २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा आहे. पांढरे सोने समजल्या जाणार्‍या कपाशी पिकावर ह्यपॅराविल्टह्ण रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाअभावी कपाशीची झाडे सुकण्याच्या मार्गावर असून, पश्‍चिम वर्‍हाडातील पीक धोक्यात आल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
बुलडाणा, अकोला व वाशिम या पश्‍चिम वर्‍हाडातील तिन्ही जिल्ह्यांत यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शेतकर्‍यांनी खरिप पेरणीला सुरुवात केली. राज्यात सुमारे ४0 लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आली. पश्‍चिम वर्‍हाडात सुमारे २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावर कपाशी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ८५0, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ व वाशिम जिल्ह्यात ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. खरिपाची पेरणी उशिरा झाल्याचा फटका आधीच कपाशीला बसला होता. सप्टेंबर महिन्याअखेर पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. यातूनच कपाशीसारख्या पिकालाही ह्यपॅराविल्टह्णसारख्या रोगाने ग्रासले. त्यामुळे कपाशीचे पीक करपू लागले असून, पश्‍चिम वर्‍हाडातील कापूस उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तालुका कृषी अधिकारी मधुकर काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कपाशी पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगुण प्रत्यक्ष शेतात जावून पाहणीसुद्धा केली जात असल्याचे सांगीतले. कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार वेळीच उपाययोजना करण्याचे अवाहन केले आहे.

Web Title: Influence of paravilt disease on cotton