शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्याच्या किंमतीत वाढ; व्यावसायिक अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:46 IST

सहा हजाराच्या आसपास प्रती ब्रास असलेली रेती आता ८ हजार रुपयाच्या आसपास मिळत आहे.

संतोष वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाउनमध्ये २४ मार्चपासून ठप्प असलेली विविध प्रकारची बांधकामे ४ मे पासून बऱ्याच प्रमाणात सुरू झाली. मात्र, बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांसह घर बांधकाम करणाऱ्यांनाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. लॉकडाउनपूर्वी सहा हजाराच्या आसपास प्रती ब्रास असलेली रेती आता ८ हजार रुपयाच्या आसपास मिळत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून देशात २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. या दरम्यान सर्वच प्रकारातील व्यवसायांना जबर फटका बसला. यामधून बांधकाम क्षेत्रही सुटू शकले नाही. वाशिम जिल्ह्याचा समावेश हा ‘नॉन रेड झोन’मध्ये असल्याने बांधकाम क्षेत्राला सुट मिळाली. नागरिक आपले घराचे स्वप्न साकारण्यासाठी अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर बांधकाम व्यावसायिकदेखील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. दुसरीकडे याच दरम्यान, सिमेंट, लोखंड, वीट, रेती आदींच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका घर बांधकाम करणाºया नागरिकांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

लॉकडाउनपूर्वी सिमेंटची प्रती बॅग २७० ते २८० रुपयाला मिळत होती. आता याच बॅगची किंमत ३९० ते ४०० रुपयादरम्यान आहे. दोन महिन्यांपूर्वी लोखंडाचे भाव ३८०० ते ३९०० रुपये क्विंटल होते. आता ४८०० ते ४९०० रुपये प्रती क्विंटल असे दर आहेत. लॉकडाउनपूर्वी ६८०० रुपयाला एक हजार वीट मिळत होती. आता हेच दर ७८०० ते ७९०० रुपयादरम्यान आहेत. दोन महिन्याच्या कालावधीत रेतीच्या प्रती ब्रास किंमतीत दोन हजार रुपयाने वाढ झाली आहे. वाढत्या किंमतीचा भुर्दंड व्यावसायिकांना बसत आहे.

टॅग्स :washimवाशिम