वृक्षलागवड, संगोपनाचा मुद्दा स्थायी विषय म्हणून विषयसुचित अंतर्भूत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:10 IST2017-12-20T15:08:38+5:302017-12-20T15:10:45+5:30

वाशिम: जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाºया प्रशासकीय बैठकांमधील विषयसुचित वृक्षलागवड आणि संगोपन हा मुद्दा स्थायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासोबतच या विषयावर नियमित सांगोपांग चर्चा व्हायला हवी, अशा सूचना शासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासनाला दिल्या आहेत.

Include topics like tree plantation, issue of rearing as a permanent topic! | वृक्षलागवड, संगोपनाचा मुद्दा स्थायी विषय म्हणून विषयसुचित अंतर्भूत करा!

वृक्षलागवड, संगोपनाचा मुद्दा स्थायी विषय म्हणून विषयसुचित अंतर्भूत करा!

ठळक मुद्देशासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासनाला अशा सूचना दिल्या आहेत.वृक्षलागवडीचे उद्दीष्ट साध्य होण्यासोबतच आतापर्यंत लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल आणि संगोपन योग्यरित्या होणे गरजेचे आहे.


वाशिम: जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाºया प्रशासकीय बैठकांमधील विषयसुचित वृक्षलागवड आणि संगोपन हा मुद्दा स्थायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासोबतच या विषयावर नियमित सांगोपांग चर्चा व्हायला हवी, अशा सूचना शासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासनाला दिल्या आहेत.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, सन २०१७ ते २०१९ या कालावधीत वृक्षलागवड कार्यक्रमाचा नियोजन आराखडा तयार करून कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वृक्षलागवडीचे उद्दीष्ट साध्य होण्यासोबतच आतापर्यंत लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल आणि संगोपन योग्यरित्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण, मृत झाडांच्या जागी नव्याने झालेली लागवड, वृक्षलागवडीच्या उद्दीष्टानुसार वृक्षारोपणासाठी स्थळ निश्चिती, रोपांची उपलब्धता, आवश्यक त्या तांत्रिक परिमाणाप्रमाणे विहित कालावधीत तथा निकषांप्रमाणे खड्डे तयार करणे, निधीची उपलब्धता आदींसदर्भात प्रशासकीय स्तरावरील बैठकांमध्ये आढावा घेण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, वनसंरक्षक, जिल्हा स्तरावरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लघुसिंचन कार्यकारी अभियंता, जिल्हा कोषागार अधिकारी आदिंना शासनाचे आदेश प्राप्त झाले असून त्यानुषंगाने कार्यवाही सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Include topics like tree plantation, issue of rearing as a permanent topic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम