शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा विरासत ‘नंगारा’ म्युझियमचे लोकार्पण, पंतप्रधान मोदी यांनी वाजविला नगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 09:37 IST

संस्कृती दर्शविणारे पाच मजली नंगारा वस्तुसंग्रहालय 

लोकमत न्यूज नेटवर्क, वाशिम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी सकाळी विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजविला. 

देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून  पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वस्तूसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तू संग्रहालयाचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान, येथे उभे झालेले भव्यदिव्य नंगारा वस्तू संग्रहालय देशभरात लोकप्रिय होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

काँग्रेसने देशाला केवळ लुटण्याचे काम केले!

देशातील दलित, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या माघारलेल्या समाजाला काँग्रेसने कायम नजरेआड केले. काँग्रेसने देशाला आजवर केवळ लुटण्याचेच काम केले. कमजोर वर्ग, गरीब घटक अविकसित कसा राहील, याकडे काँग्रेसने विशेष लक्ष दिले. मात्र, भाजपने वंचित, गोरगरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधानांनी केली. बंजारा भाषेतून भाषणाची सुरूवात पंतप्रधानांनी भाषणाची सुरूवात बंजारा भाषेतून केली. ‘पोहरादेवी को प्रणाम, जय सेवालाल, जय रामराव महाराज,’ असे म्हणत त्यांनी समाजाच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य केले.

१८ वे अनुदान जमा

- पंतप्रधानांच्या हस्ते १६ हजार मेगावॅटच्या सौरऊर्जा उत्पादन परियोजनांतर्गत पाच सौर पार्कचे उद्घाटन झाले.

- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ९५०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ व्या हप्त्याचे २० हजार कोटींचे अनुदान जमा करण्यात आले.

- नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत १९०० कोटी रुपयेदेखील शनिवारी देण्यात आले.

जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय 

- १६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तू कलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वस्तूसंग्रहालय पाच मजली आहे. त्यात १३ विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन हाेत आहे.

- याशिवाय फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येत आहे. १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. 

आता खऱ्या अर्थाने बंजारा काशी उभी झाली

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे भव्यदिव्य स्वरूपात नंगारा वस्तू संग्रहालय उभे झाले. बंजारा समाजाच्या समृद्ध आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या या संग्रहालयामुळे पोहरादेवीत आता खऱ्या अर्थाने बंजारा काशी उदयास आली. जगभरात मोदींचा प्रभाव वाढत असल्याचे  सांगून ‘जलनेवाले जलते रहेंगे, हम ताकद से आगे बढेंगे, पुरे विश्व पर राज करेंगे,’ - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

विकासकामांची सेंच्युरी 

संत डॉ. रामराव महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोहरादेवी येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी पोहरादेवीत येऊन नंगारा संग्रहालयाचे लोकार्पण केले. पोहरादेवीच्या विकासाला ७०० कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून, बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीwashimवाशिम