शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा - तिवारी

By admin | Updated: September 10, 2015 02:16 IST

आढावा बैठकीत स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सुचना.

वाशिम : राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून, या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधित शासकीय विभागांनी करावी, अशा सूचना करीत उपाययोजनांचा आढावा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत घेतला. आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची आकडेवारी लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सर्व शेतकर्‍्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दरात धान्य देणे व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे आदी योजनांचा समावेश आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवीत आहे. या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करून या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना देणे, ही सर्व संबधित शासकीय विभागांची जबाबदारी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, असे तिवारी यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे नैराश्य दूर करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शेतकरी कर्ज पुनर्गठन, कृषीविषयक योजना, धडक सिंचन योजनेतील विहिरी, रोजगार हमी योजना तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी याविषीय बैठकीत चर्चा झाली.