शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 15, 2017 01:43 IST

पाण्यासाठी वणवण : समस्या निवारणासाठी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात

मालेगाव : तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची घडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी करण्यासाठी गावातील महिलांनी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथे ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठ्याची विशेष किंवा ठाम व्यवस्था नाही. या ठिकाणी खासगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, ही विहीर मार्च महिन्यात कोरडी पडते. त्यामुळे गावकऱ्यांना एक किलोमीटर अंतरावरून उन्हातान्हात पायपीट करीत डोक्यावर पाणी आणावे लागते. महिला वर्ग पाण्यासाठी भटकंती करीत असल्याने मुला-बाळांना त्याची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, स्वच्छ अभियानांतर्गत शौचालयांचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असले, तरी पाणीच नसल्याने शौचालयांचा वापर ग्रामस्थांना करणे अशक्य होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सोमठाणा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन सोमठाण्याच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. कायमस्वरूपी उपाय करण्याची गरजमालेगाव तालुक्यातील सोमठाणा या गावात पाणीटंचाई ही समस्या पूर्वापार चालत आली आहे. या गावातील लोकांना प्रत्येक उन्हाळ्यात या समस्येचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी या समस्येवर आपल्या स्तरावरून उपाय करण्याचे प्रयत्न करीत असले, तरी त्यांना वरिष्ठ स्तरावरून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्यानंतरच येथील ग्रामस्थांची पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकेल.