शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतूकबंदी कागदावरच!

By admin | Updated: November 30, 2014 23:55 IST

वाशिम शहरातील प्रकार: रस्तेच बनले पार्कींग झोन ,गर्दीच्या वेळी शहरात येतात मालाचे ट्रक.

शिखरचंद बागरेचा /वाशिम
स्थानिक जिल्हाप्रशासनाने गत वर्षीपासून वाशिम शहरात ऐन गर्दीच्या वेळी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीस व प्रवेशास बंदी घातलेल्या आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत तथापि, सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे व्यावसायीक, मालवाहतुकीदार व संबंधित यंणा कानाडोळा करीत असल्यामुळे जिल्हाप्रशासनाने जारी केलेले आदेश केवळ कागदोपत्रीच राहीले असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अकोला नाका ते पाटणी चौक मार्गे शिवाजी चौक व पोष्ट ऑफीस चौक ते आंबेडकर चौक पाटणीचौक, रिसोड नाकामार्गे लाखाळा, शिवाजी चौक ते बँकऑफ महाराष्ट्र समोरील चौक या प्रमुख रस्त्यांवर वाशिम शहरातील बहुतांश बाजारपेठ मार्केट आहे. जिल्हाधिकार्‍यांनी वाशिम शहरातील अकोला नाका ते शिवाजी चौक व पोष्टऑफीस चौक ते पारसप्लाझा या रस्त्यांवर सकाळी ९ ते रात्री ९ या काळात या रस्त्यावर अवजड वाहतुकीस व अवजड वाहनांना प्रवेशबंदी घातली होती.प्रारंभी तिचे काहीकाळपर्यंत काटेकोरपणे पालन करण्यात आले मात्र, नंतर या अवजडबंदी आदेशची अंमलबजावणी होणे थांबले आता शहरात केंव्हाही मालवाहतुकीची वाहने दुकानापुढे उभी करुन माल चढविणे उतरविणे सुरु केले जाते कुठेही ट्रक उभे केले जातात परिणामी, वाहतुकीची कोंडी होत असून यामध्ये नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत.