शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

वृक्ष लागवडीसाठी ‘आशा’ही सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:03 PM

राजुरा - पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षलागवड मोहिम शासनाने हाती घेतली असून, आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशास्वयंसेविकाही पुढे सरसावल्या असून १ जुलैपासुन जिल्हाभरात एक जन्म एक वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला.

ठळक मुद्देभारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए.एस.नाथन हे ‘एक जन्म एक वृक्ष’या मोहिमेची अंमलबजावणी करत आहेत. मोहीमेंतर्गत ज्या कुटूंबात नवजात बालकांचा जन्म झाला त्या कुटूंबांचेवतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते.वृक्षाचे जतन करण्याकरिता आशा स्वयंसेविका वारंवार त्या कुटूंबांचे घरी जावुन वृक्षसंवर्धनबाबत प्रोत्साहीत करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा - पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षलागवड मोहिम शासनाने हाती घेतली असून, आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशास्वयंसेविकाही पुढे सरसावल्या असून १ जुलैपासुन जिल्हाभरात एक जन्म एक वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला.भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए.एस.नाथन हे ‘एक जन्म एक वृक्ष’या मोहिमेची अंमलबजावणी करत आहेत. सदर मोहीमेंतर्गत ज्या कुटूंबात नवजात बालकांचा जन्म झाला त्या कुटूंबांचेवतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. वृक्षाचे जतन करण्याकरिता आशा स्वयंसेविका वारंवार त्या कुटूंबांचे घरी जावुन वृक्षसंवर्धनबाबत प्रोत्साहीत करीत आहेत. सदर उपक्रमामुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे.विशेषत: नवजात बालकांचे जे नाव कुटुंबियांकडुन ठेवण्यात येईल, तेच नाव वृक्षालाही देण्यात येत असून बाळांच्या वाढदिवसाप्रमाणे वृक्षाचाही वाढदिवस साजरा करण्यासाठी आशा स्वयंसेविका  ग्रामस्थांना प्रेरीत करीत आहेत. यामुळे बाळाप्रमाणे त्या कुटूंबाला वृक्षाविषयहीदेखील लळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा स्वयंसेविका कुटुंबांना वारंवार भेटी देवुन झाडाला काटेरी कुंपन तयार करणे व उन्हाळ्याचे दिवसात झाडाची निगा कशा प्रकारे राखायची या बाबतचे मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल मेहकरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  डॉ.ज्ञानेश्वर ससे, आशा जिल्हा समुह संघटक अनिल उंदरे व सर्व तालुका समुह संघटकांचे मार्गदर्शनाखाली  जिल्हाभरातील  एक हजारावर आशा स्वयंसेविकांनी एक जन्म-एक वृक्ष या उपक्रमास १ जुलैपासुन प्रारंभ केल्याने वृक्षारोपण मोहिमेस चांगलाच हातभार लाभणार आहे.

टॅग्स :washimवाशिमNatureनिसर्ग