शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात अर्धिअधिक जमीन पेरणीविना!

By admin | Updated: February 3, 2015 00:00 IST

वाशिम जिल्ह्यात २0१४-१५ च्या रब्बी हंगामात केवळ ६0 हजार हेक्टरवर पेरणी.

संतोष वानखडे / वाशिम:२0१४ या वर्षातील अल्प पावसाचे दुरगामी परिणाम बळीराजाला भोगावे लागत आहे. २0१३-१४ या वर्षाच्या तुलनेत २0१४-१५ या वर्षात रब्बी हंगामात जिल्ह्यातील अर्धिअधिक जमीन पेरणीविना असल्याची साक्ष कृषी विभागाची आकडेवारी देत आहे. २0१३-१४ या वर्षात एक लाख २७ हजार हेक्टरवर तर २0१४-१५ या वर्षात ६0 हजार ५५४ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे.जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या खाईत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी, २0१४ च्या सुरूवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच पुरता हतबल झालेला होता. अशातच २0१४ मध्ये निसर्गानेही दगा दिला. अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हाती आले नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, जमिनीत ओलावा राहिला नाही. दज्रेदार जमीन असलेल्या आणि सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. उर्वरीत शेतकर्‍यांनी जमिन पेरणीविना तशीच ठेवण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रफळात तब्बल ६६ हजार ६४१ हेक्टरची घट आली आहे. २0१३-२0१४ मध्ये रब्बी ज्वारी ३६९ तर २0१४-२0१५ मध्ये ९३४ हेक्टर पेरणी झाली आहे. २0१३-२0१४ मध्ये गहू ३0 हजार ५0५ तर २0१४-२0१५ मध्ये १४ हजार ८५७ हेक्टरपर्यंत पेरणी घसरली आहे. २0१३-२0१४ मध्ये मक्का ४६ तर २0१४-२0१५ मध्ये २३0 हेक्टर, २0१३-२0१४ मध्ये हरभरा ९४ हजार एक हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी अध्र्यापेक्षाही कमी पेरणी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २0१४-२0१५ मध्ये केवळ ४३ हजार ७९३ हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी झाली आहे.