साडेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 17:29 IST2021-04-11T17:28:49+5:302021-04-11T17:29:18+5:30
Gutkha worth Rs 3.5 lakh seized : मुर्तीजापुर खेर्डा फाटयाजवळ महींद्रा गाडीमध्ये तीन लाख ५१ हजार रूपयाचा गुटखा १० एप्रिल रेाजी रात्रीच्या दरम्यान जप्त केला.

साडेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त
कारंजा लाड : ग्रामीण पोलीसांना मीळालेल्या माहीतीनुसार मुर्तीजापुर खेर्डा फाटयाजवळ महींद्रा गाडीमध्ये तीन लाख ५१ हजार रूपयाचा गुटखा १० एप्रिल रेाजी रात्रीच्या दरम्यान जप्त केला.
ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार धनराज पवार यांनी कारंजा ग्रामीण पोलीसांत नोंद केली की खेर्डा फाटयाजवळ एम. एच. ३० बी.डी.३३५७ वाहन थांबवले असता, गाडीमध्ये ६ पोते गुटखा अन्य प्रकारातील गुटखा असा एकुण ३ लाख एकावन हजार रूपयाचा गुटखा व पिकअप वाहन ७ लाख रूपये असा एकुण १० लाख ५१ हजाराचा माल गाडी चालक फीरोज खाॅ शमीउल्ला खाॅ (३३) यांच्या कडून जप्त करण्यात आला. या संदर्भातील माहीती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याची माहीती ग्रामीण पोलीसांकडून देण्यात आली.