शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शाळा वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार!

By संतोष वानखडे | Updated: May 19, 2024 17:38 IST

शाळा बचाव समितीची बैठक : ग्रामसभांचे ठराव घेणार

वाशिम : पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करणे, समूळ शाळेच्या माध्यमातून समायोजन करणे आदी प्रकाराला विरोध करीत सर्व सरकारी शाळा वाचविण्यासाठी जिल्ह्यात लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार रविवारी (दि.१९) वाशिम येथे पार पडलेल्या शाळा बचाव समितीच्या बैठकीत करण्यात आला. स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे पार पडलेल्या बैठकीला शिक्षण बचाव समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निमंत्रक रमेश बीजेकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  

यावेळी डॉ. रवी जाधव, गजानन धामणे, प्रल्हाद पौळकर, रामचंद्र वाढे, भागवत मोहिरे, प्रशांत देशमुख, महेंद्र खडसे, रामदास आरू, अजय सोनुनकर, जगदेव राऊत, राहुल भगत, प्रमोदकुमार राऊत, राम शृंगारे, मधुकर महाले, निलेश राठोड, सुगत तायडे, ज्ञानेश्वर गवळी, नागेश काळे, रितेश राऊत, दत्तात्रय राजगुरू आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारने २०२० ला लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी देश पातळीवर केली जात आहे. राज्य सरकारकडून याची अंमलबजावणी करताना समूह शाळेच्या माध्यमातून समायोजनेच्या नावाखाली कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांना कायमचे टाळे ठोकले जात असल्याचा आरोप यावेळी रमेश बिजेकर यांच्यासह मान्यवरांनी केला. शाळा बचाव समितीच्या माध्यमातून शाळा बंद होणाऱ्या गावांमध्ये प्रबोधन करून बंद होणाऱ्या शाळांना वाचविण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेण्यात येणार आहेत. ते ठराव शासनाला पाठविले जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.मंगेश भुताडे यांनी तर प्रास्ताविक गजानन धामणे यांनी केले. गावोगावी प्रबोधन करणारवाशिम जिल्ह्यातील कमी पटसंख्या असणाऱ्या १५० पेक्षा अधिक सरकारी शाळांना वाचविण्यासाठी शाळा बचाव समितीकडून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. संबंधित गावांना भेटी देऊन त्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तसेच शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शाळा बचाव समितीचे प्रभावी संघटन बांधण्यासाठी अध्यक्ष मंडळ, सचिव मंडळ, कार्यकारी मंडळ या माध्यमातून पदनिर्मिती करून शाळा वाचविण्यासाठी लोकचळवळीला बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा