शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

वाहन बाजाराला ‘अच्छे दिन’ !

By admin | Updated: April 20, 2017 02:11 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन विक्रीत वाढ : १८ हजार २३० वाहनांची विक्री

वाशिम : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन बाजाराला ‘अच्छे दिन’ आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सन २०१५-१६ या वर्षात १५ हजाराच्या आसपास वाहनांची विक्री झाली होती. सन २०१६-१७ या वर्षात १८ हजार २३० वाहनांची विक्री झाली.सन २०१४ ते २०१५ या वर्षात निसर्गाची साथ न मिळाल्याचा फटका वाहन बाजारालादेखील बसला होता. २०१६ मध्ये पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने वाहन बाजाराला २०१६ वर्षे अनुकूल राहिल्याचे दिसून येते. एरव्ही १३ ते १४ हजारादरम्यान वाहन विक्री असताना, २०१६-१७ या वर्षात १८ हजारावर वाहन विक्री झाली. या सत्रात जिल्ह्यात एकूण १८ हजार २३० नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात १५ हजार ३८१ दुचाकी, ९७४ चारचाकी (कार व जीप), १ आॅटोरिक्षा, ५१ ट्रक, ३५६ डिलीव्हरी व्हॅन, १४४५ ट्रॅक्टर-ट्रेलर, २२ प्रवासी वाहनांचा समावेश आहे. गतवर्षी १५ हजाराच्या आसपास वाहन विक्री झाली होती. यामध्ये ११ हजार ३४० मोटारसायकली, ८९३ कार, ११५८ ट्रॅक्टर, ट्रेलर यासह अन्य वाहनांच्या विक्रीचा समावेश आहे.तसेच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून २० हजार ५६८ चालकांनी वाहन चालक परवाना काढला आहे. वाहतुकीच्या नियमांचा एक भाग म्हणून वाहन चालविण्यासाठी चालकाला वाहन चालक परवाना बंधनकारक आहे. वाहन चालक परवाना काढण्यासाठी चालकाला आॅनलाईन परीक्षा व वाहन चालक चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर परवाना दिला जातो. २०१६-१७ या वर्षात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे २०५६८ जणांनी या दोन्ही चाचण्या उत्तीर्ण केल्याने त्यांना वाहन चालक परवाना देण्यात आला. ३३३७ जणांना नवीन वाहक परवाना (कंडक्टर लायसन्स) देण्यात आले.