दुकानं फोडून धान्य पळवणारी टोळी जेरबंद, धान्य आणि एका जीपसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:37 PM2021-07-26T18:37:36+5:302021-07-26T18:38:35+5:30

हिंगोली : दुकानं फोडून धान्य पळवणाऱ्या तीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून एक जीप व दुकानातून ...

The gang that broke into the shop and snatched the grain was arrested, along with a jeep | दुकानं फोडून धान्य पळवणारी टोळी जेरबंद, धान्य आणि एका जीपसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

दुकानं फोडून धान्य पळवणारी टोळी जेरबंद, धान्य आणि एका जीपसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्दे5 दुकाने फोडून त्यातील धान्य लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या.

हिंगोलीदुकानं फोडून धान्य पळवणाऱ्या तीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून एक जीप व दुकानातून लांबविलेले धान्य असा 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात हिंगोली, गंगानगर, खानापूर चित्ता, कळमनुरी, आखाडा बाळापूर येथील एकूण 5 दुकाने फोडून त्यातील धान्य लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या.

धान्य चोरणारी टोळी सक्रीय झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक नियुक्त केले. धान्य चोरी करणारी टोळी वाशीम जिल्ह्यात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून अकोला जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या व 30 ते 40 घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हसन उर्फ इमी छट्टू निनसुरवाले (रा. गवळीपुरा कारंजा) यास ताब्यात घेतले.

त्यास विचारपूस केली असता त्याने फेरोजखान जसिमखॉन पठाण (रा. कालापाणी, कारंजा लाड) व मोईन उर्फ अन्ना चाँद लंगे (रा. कारंजा) यांच्या मदतीने एम.एच.37 ए 3266 क्रमांकाच्या महिंद्रा झायलो कारचा वापर करून चोऱ्या केल्याची कबूली दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कार व चोरीला गेलेले धान्य असा 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकूळे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे, असलम गारवे, जयप्रकाश झाडे, सुमित टाले, इरफान पठाण आदींचा समावेश होता.

Web Title: The gang that broke into the shop and snatched the grain was arrested, along with a jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.