शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात राहणार तगडा  बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:40 IST

वाशिम: जिल्हय़ात मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश  विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यादरम्यान  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोमवार पासूनच ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्व उपाययोजना  करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देदीड हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारीकायदा-सुव्यवस्था भंग करणार्‍यांवर कडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ात मंगळवार, ५ सप्टेंबरपासून गणेश  विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यादरम्यान  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोमवार पासूनच ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्व उपाययोजना  करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्हय़ात यंदा शहरी भागात २४५; तर ग्रामीण भागात  ४४१ अशा एकंदरित ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची स् थापना झाली आहे. तथापि, मंगळवार आणि बुधवार अशा  दोन दिवशी ‘श्रीं’ना निरोप दिला जाणार असून, यानिमित्त  काढल्या जाणार्‍या मिरवणुकांमध्ये कायदा-सुव्यवस्था  अबाधित राहण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात  आल्या आहेत. त्यानुसार, जिल्हय़ातील महत्त्वाच्या शहरा तील विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसी कॅमेरे बसविण्यात  आले आहेत. त्याचे सनियंत्रण पोलीस स्टेशन व पोलीस  अधीक्षक यांच्या दालनातून केले जाणार आहे. यंदा  विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यावर पूर्णत: बंदी  लादण्यात आली असून, नियमाचा भंग करणारे गणेश  मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह डीजे मालकावरही कारवाई  केली जाणार आहे. मद्यविक्री करणे, जवळ बाळगणे यावरदेखील पोलीस  प्रशासनाची करडी नजर असणार असून, विक्रेते तसेच  मद्यपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी  श्‍वास चाचणीमापक यंत्रे बंदोबस्तावरील अधिकारी,  कर्मचार्‍यांकडे देण्यात आली आहेत. मिरवणुकीदरम्यान  कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील याच्या अधिपत्याखाली अप्पर  पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, २५ पोलीस  निरीक्षक, ७0 सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक  १0३२ पोलीस कर्मचारी, ४00 होमगार्ड, एक एसआरपीफ  कंपनी, दोन दंगा नियंत्रक पथक व एक अतिजलद प्र ितसाद पथक आवश्यक त्या सर्व शस्त्रास्त्र व साहित्यानिशी  बंदोबस्तासाठी तयार करण्यात आले आहे. हा बंदोबस्त ४  सप्टेंबरपासूनच तैनात केला जाणार असल्याचे मोक्षदा  पाटील यांनी सांगितले. तथापि, यावर्षी बंदोबस्तावर  असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वेगळया पद्धतीने  कर्तव्य बजावताना दिसून येतील. त्यामुळे कुणीही कायदा  व नियमांचे उल्लंघन न करता पोलीस प्रशासनाला सहकार्य  करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.