एक हजार भाविकांनी केले गजानन विजय ग्रंथ पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:59 IST2018-08-17T16:59:12+5:302018-08-17T16:59:53+5:30

मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात  आले.

Gajanana Vijay Granth Parayan is done by thousands of devotees | एक हजार भाविकांनी केले गजानन विजय ग्रंथ पारायण

एक हजार भाविकांनी केले गजानन विजय ग्रंथ पारायण

लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात  आले. या धार्मिक सोहळ्यात १ हजारावर भाविक सहभागी झाले होते. अरविंद देशमुख आणि रंजना देशमुख यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. 
मुंबई येथील विद्या पडवळ यांना श्री गजानन विजय ग्रंथ मुखपाठ आहे. त्यांच्या वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम मालेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत भाविकांनी संपूर्ण ग्रंथाचे मुखोद्गत पारायण केले. या पारायणात एक हजारांहून अधिक पुरुष व महिला भाविक सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता या पारायणाला सुरुवाम झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. पारायणात सहभागी सर्व भाविकांना फराळ आणि चहापान देण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Web Title: Gajanana Vijay Granth Parayan is done by thousands of devotees