कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी निधी पडतोय अपुरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:24 PM2018-11-21T17:24:11+5:302018-11-21T17:24:27+5:30

वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेवून जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यास सुरूवात केली.

funding is less for Agricultural mechanization sub-campaign! | कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी निधी पडतोय अपुरा!

कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी निधी पडतोय अपुरा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अ‍ॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेवून जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यास सुरूवात केली. मात्र, यामाध्यमातून ट्रॅक्टरसह अन्य बाबींसाठी तालुकानिहाय केवळ ९ ते १० लाख रुपयांचीच असल्याने अनेक पात्र लाभार्थी शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानात सहभागी होण्यासाठी शासनाने आधी १५ जुलै ही अंतीम मुदत दिली होती. त्यात मध्यंतरी वाढ करून १५ आॅगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, शेकडो शेतकºयांनी अर्ज दाखल केले. त्याची तालुका कृषी विभागाकडून छानणी, पडताळणी करून रितसर प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. मात्र, दाखल झालेल्या शेकडो अर्जांमधून लाभार्थींची निवड करताना कृषी विभागाची चांगलीच दमछाक झाली. याशिवाय मुळातच निधीची कमतरता असल्याने मोजक्याच शेतकºयांची निवड झाल्याने डावलल्या गेलेल्या शेतकºयांमधून याप्रती नाराजी व्यक्त करण्यात आली. 

तालुकानिहाय चार लाभार्थींनाच ट्रॅक्टरसाठी अनुदान!
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत समाविष्ट जिल्ह्यातील २५ गावांमध्ये प्रत्येकी १० शेतकºयांची निवड करून संबंधित शेतकºयांना त्यांच्या पसंतीचे कृषीपयोगी साहित्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, निधीची तरतूद अगदीच कमी प्रमाणात असल्याने तालुकानिहाय जेमतेम ४ लाभार्थींनाच सव्वा लाख रुपये याप्रमाणे अनुदान देणे शक्य होणार आहे. 
 

शासनाच्या निर्देशानुसार गतवर्षी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीही शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले होते. देय असलेल्या अनुदानाप्रमाणेच लाभार्थींची निवड करण्यात आली.
- दतात्रय गावसाने 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: funding is less for Agricultural mechanization sub-campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.