कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:53 IST2017-12-28T18:52:21+5:302017-12-28T18:53:55+5:30

कारंजा लाड: येथील नृसिंह स्वामी सरस्वती महाराज जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाºया भाविकांची कार आणि ला ट्रकची धडक होऊन घडलेल्या अपघातात चार भाविक जखमी झाले. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिलखेडनजिक २८ डिसेंबर रोजी  घडली. 

Four people injured in a car accident near Karanja | कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी

कारंजाजवळ भाविकांच्या कारला अपघात, चार जण जखमी

ठळक मुद्देही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिलखेडनजिक २८ डिसेंबर रोजी  घडली.  कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व कापसाने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.

कारंजा लाड: येथील नृसिंह स्वामी सरस्वती महाराज जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाºया भाविकांची कार आणि ला ट्रकची धडक होऊन घडलेल्या अपघातात चार भाविक जखमी झाले. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिलखेडनजिक २८ डिसेंबर रोजी  घडली. 

प्राप्त माहितीनुसार कारंजा येथील गुरू मंदिरात २० डिसेंबर पासून श्री  नृसिंह सरस्वती महाराज जन्मोत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्त नागपूर येथील भाविक एम एच-३१ इके, ४७५१ क्रमांकाच्या कारने कारंजा येथे येत होते.  कार कारंजा शहरानजिक असलेल्या भिलखेड येथे पोहोचली. त्यावेळी कारंजाहून मूुर्तिजापुरकडे जाणाºया एम एच-२९, टी-८८४ क्रमांकाच्या कापूस भरलेल्या ट्रकने या कारला धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले, तसेच कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व कापसाने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. वृत्त लिहित असेपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाही. 

Web Title: Four people injured in a car accident near Karanja