धरणाच्या सांडव्यात बुडून चौघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:36 PM2020-09-22T17:36:17+5:302020-09-22T17:37:48+5:30

भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३०) व महादेव इंगळे (३०) हे चौघे शेतात गेले होते

Four drowned in dam drain | धरणाच्या सांडव्यात बुडून चौघांचा मृत्यू 

धरणाच्या सांडव्यात बुडून चौघांचा मृत्यू 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): धरणाच्या सांडव्यात वाहून गेल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणावर २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
मोतसावंगा येथील भाऊराव खेकडे (६५), दिलीप वाघमारे (३५), गोपाल जामकर (३०) व महादेव इंगळे (३०) हे चौघे शेतात गेले होते. शेतातून घरी परत येत असतानाच मोतसावंगा धरणाच्या सांडव्याच्या प्रवाहात  हे चौघे वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती सुरुवातीला गावकºयांना मिळताच काही गावकरी या चारही जणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले. त्यात सुरुवातीला त्यांना भाऊराव खेकडे यांचा मृतदेह सापडला, तर इतर तिघांचेही मृतदेह दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सापडले. घटनास्थळी मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे, आसेगावचे ठाणेदार लष्करे यांच्यासह वसंत भोंडणे, महादेव सातपुते व मोतसावंगा येथील गावकरी हजर होते. गावातील चार व्यक्ती  मृत झाल्याने गावात शोककळा पसरली होती.

Web Title: Four drowned in dam drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.