शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

गावरान आंबे खरेदीसाठी लोकांची झुंबड

By admin | Updated: May 15, 2017 01:20 IST

शिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. फळांचा राजा म्हणून ओळखल जाणाऱ्या आंब्याच्या अनेक जाती आहेत. यामध्ये बैगनपल्ली, दसेरी, केसर, पायरी, हापूस, लंगडा, भागमभाग, तोतापुरी (कलमी), नीलम, गोवा मानकूर, रत्ना, मल्लिका, आम्रपाली, सुवर्णरेखा, मालगीज, मालगोबा, नागीण, भोपळी आणि बोरशा यांचा प्रामुख्याने समावेश आहे; परंतु या सर्व आंब्यापेक्षा विदर्भातील गावराण आंब्यांची गोडी सर्वांनाच भुरळ घालणार आहे. अलिकडच्या काळात गावराण आंबे वृक्षतोडीमुळे मिळेनासे झाली असले तरी, या आंब्यांना आजही मोठी मागणी आहे. सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम जोरात सुरुआहे. विविध ठिकाणच्या बाजारात अनेक विक्रेते आंब्याची दुकाने थाटून बसल्याचे दिसतात. तथापि, गावराण आंब्याची दुकाने मात्र मोजकीच असल्याने गावराण आंंब्याच्या खरेदीसाठी लोक आतूर असल्याचे दिसते. त्यामुळे शिरपूर बसस्थानक परिसरात उत्तप्रदेशातून आणलेल्या दशहरी, लंगडा, केसर या आंब्यांवर परिसरातील गावराण आंबा भारी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. गावराणी आंबा बाजारात विक्रीला येण्यापुर्वी बारात उत्तरप्रदेशातील दशहरी, लंगडा केसर बदाम या आंब्याला ग्राहकांकडून मोइी मागणी होत होती उत्तरप्रदेशातील हे आंबे फेब्रुवारी पासूनच कृतीम पद्धतीने पिकवून बाजारात विक्री जात आहेत तर गावराण आंबा हा एप्रिल मध्ये पिकतो आता गावराण आंब्याने बाजारात परप्रांतीय आंब्याला मोठी टक्कर दिलीअसून दशहरी लंगडा, केसर, बदाम या आंब्याची मक्ेतदरी मोडीत काढून गावरान आंब्याने बाजारात दबदबा कायम केला परसिरात आंबा बसस्थानक परिसरात दररोज सकाळी ७ ते १० या काळात आंबे विक्रीसाठी आणित आहे या काळात परप्रांतीय आब्याला दुकानाकडे कुणी पाहतही नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावराणी आंबा परप्रांतीय आंब्यावर भारीच असल्याचे सिद्ध होत आहे.