आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:03 IST2025-01-08T19:59:37+5:302025-01-08T20:03:39+5:30

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे. २५ वर्षीय मुलाने बापाचे दगडाने प्रहार करत हत्या केली. 

First he killed his father, then he sat near the body until the police arrived; villagers were shocked | आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले

आधी बापाची हत्या केली, नंतर पोलीस येईपर्यंत मृतदेहाजवळ राहिला बसून; ग्रामस्थ हादरले

रिसोड (जि.वाशिम) : वेडसर मुलाने वडीलाच्या डोक्यात दगडाने जबर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास लोणी बु. (ता.रिसोड) येथे घडली. निवृत्ती पुंजाजी नरवाडे (६५) असे मृतकाचे नाव असून, गणेश निवृत्ती नरवाडे (२५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मागील काही महिन्यात घडलेल्या खुनाच्या घटनांनी लोणी बु. गाव हादरले आहे. ८ जानेवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास निवृत्ती नरवाडे व त्यांचा वेडसर मुलगा गणेश हे दोघेही घरीच होते. 

गणेशने अचानक वडिलांच्या डोक्यावर दगडाने प्रहार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने निवृत्ती नरवाडे जमिनीवर कोसळले. 

या भयंकर प्रकाराला पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. या घटनेत निवृत्ती नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी गणेश हा वडिलाच्या मृतदेहाजवळच बसून होता. पोलीस पाटलाने घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला दिली. 

त्यानंतर ठाणेदार भूषण गावंडे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: First he killed his father, then he sat near the body until the police arrived; villagers were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.