शिकवणी वर्गाच्या इमारतींचे होणार ‘फायर सेफ्टी आॅडीट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 03:53 PM2019-06-29T15:53:35+5:302019-06-29T15:53:52+5:30

नगर परिषदांनी शिकवणी वर्गाला नोटीस बजावून एका महिन्याच्या आत फायर सेफ्टी आॅडीट (अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण) करण्याच्या सूचना खासगी शिकवणी वर्गाला दिलेल्या आहेत.

Fire Safety Audit of coaching Classes Buildings | शिकवणी वर्गाच्या इमारतींचे होणार ‘फायर सेफ्टी आॅडीट’ !

शिकवणी वर्गाच्या इमारतींचे होणार ‘फायर सेफ्टी आॅडीट’ !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गुजरात राज्यातील सुरत येथे शिकवणी वर्गातील आगीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिकवणी वर्गाची माहिती संकलित करून इमारतींचे ‘फायर सेफ्टी आॅडीट’ झाले किंवा नाही, याची माहिती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना दिले आहेत. त्याअनुषंगाने तपासणी केली जात आहे.
सुरत येथील शिकवणी वर्गाला आग लागल्यामुळे काही विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये म्हणून रिसोडसह अन्य काही नगर परिषदांनी शिकवणी वर्गाला नोटीस बजावून एका महिन्याच्या आत फायर सेफ्टी आॅडीट (अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण) करण्याच्या सूचना खासगी शिकवणी वर्गाला दिलेल्या आहेत.  दरम्यान यासंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बुधवारच्या सभेतही अशासकीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून शहरी भागात सुरु असलेल्या खाजगी शिकवणी वर्गाच्या इमारतींचे फायर सेफ्टी आॅडीट करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सर्व नगरपरिषद मुख्याधिकाºयांनी आपापल्या शहरात सुरु असलेल्या खासगी शिकवणी वर्गाची माहिती संकलित करावी तसेच शिकवणी वर्गाच्या इमारतींचे फायर सेफ्टी आॅडीट झाले आहे किंवा नाही, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा व मालेगाव या प्रमुख सहा शहरांमध्ये जवळपास १५० पेक्षा अधिक खासगी शिकवणी वर्ग आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीचे फायर सेफ्टी आॅडीट हे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय योजना नियम २००६ प्रमाणे महाराष्ट्र अग्निशमन सेवा, मुंबई यांनी नोंदणीकृत केलेल्या परवानाधारक संस्थेकडून करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश शिकवणी वर्गाने याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाºयांनी नगर परिषदांना पडताळणी करण्याचे निर्देश दिल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. फायर सेफ्टी आॅडीट न करणाºयांविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला.

Web Title: Fire Safety Audit of coaching Classes Buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.