आगीत घरे भस्मसात

By Admin | Updated: June 12, 2014 23:26 IST2014-06-12T23:25:38+5:302014-06-12T23:26:05+5:30

सुदी येथे घरांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे संसार व शेती उपयोगी साहित्य जळून बेचिराख झाल्याची घटना घडली.

Fire to the houses in the fire | आगीत घरे भस्मसात

आगीत घरे भस्मसात

राजुरा : येथून २ कि.मी. अंतरावरील सुदी येथे विश्‍वास तेलतुट पवार व सुभाष विनोद शिंदे या दोघांच्या घरांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे संसार व शेती उपयोगी साहित्य जळून बेचिराख झाल्याची घटना १0 जूनच्या उत्तररात्री एक वाजता दरम्यान घडली. सुदी गावाबाहेरील झोपडपट्टीत विश्‍वास तेलतुट पवार व सुभाष विनोद शिंदे हे सासरे जावाई राहतात. दोघांची घरे एकमेकांना लागून असून १0 जूनचे रात्री दोन्ही परिसरातील सदस्य घरासमोरील अंगणात गाढ झोपलेले असतांना आग लागली.घरानजीकच्या शिवदास भोयर यांच्या शेतातील विहिरी पाणीपुरवठा होऊन आग आटोक्यात आली.

Web Title: Fire to the houses in the fire