माहुली येथे घराला आग; तीन लाखांचे साहित्य जळून  खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:23 IST2019-03-18T15:23:51+5:302019-03-18T15:23:56+5:30

माहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली.

Fire at home in Mahuli; material burnt | माहुली येथे घराला आग; तीन लाखांचे साहित्य जळून  खाक

माहुली येथे घराला आग; तीन लाखांचे साहित्य जळून  खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
माहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली.
माहुली येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील जाधव यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकºयांनी धावपळ करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घरातील  टिव्ही, फ्रिज, पंखा, मोटारसायकल, कपडे, गहू, ज्वारी, दाळ आदी ३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने शेजारच्या घरांना आग लागू शकली नाही. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  तहसिलचे कर्मचारी व तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घटनास्थळाला भेट देऊन जाधव कुटुुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: Fire at home in Mahuli; material burnt