वाघी खुर्द येथे दोन एकरातील तुरीच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:50 IST2020-02-12T14:50:23+5:302020-02-12T14:50:27+5:30
हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली.

वाघी खुर्द येथे दोन एकरातील तुरीच्या गंजीला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द येथील शिवाजी आरू यांच्या दोन एकरातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना ११ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान घडली. यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली.
सन २०१९ वर्ष शेतकºयांसाठी फारशे समाधानकारक गेले नाही. कधी नैसर्गिक तर कधी मानवी संकटांमुळे शेतकºयांना समाधानकारक उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामातील कसर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी परिश्रम घेताना दिसत आहेत. मात्र, काही कुप्रवृत्तीच्या इसमांमुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द येथील शिवाजी भागवत आरू यांनी दोन एकरात तुरीची लागवड केली होती. तुरीची सोंगणी करून एका ठिकाणी गंजी लावण्यात आली होती. आरू हे शेगावला गेले होते. ही संधी साधून ११ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान किंवा १२ फेब्रुवारीच्या पहाटेदरम्यान अज्ञात इसमाने या गंजीला आग लावली. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. आगीत तूरीची गंजी जळून खाक झाल्याने हजारो रुपयांची नुकसान झाल्याची तक्रार आरू यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.