शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

‘सिग्मा’ एजन्सीवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: December 3, 2014 01:34 IST

वाशिम जिल्हाधिका-यांचे निर्देश : आरोपी निश्‍चित नाहीत.

धनंजय कपाले / वाशिम
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील ह्यफार्मासिस्टह्ण ची परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ह्यसिग्मा ओएमआरह्ण एजन्सीच्या एजंटने जिल्हा परिषद प्रशासनावर आणली. या अनुषंगाने ह्यसिग्माह्ण ला अभय कशासाठी? या मथळ्याखाली ह्यलोकमतनेह्ण २५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देष दिल्याची माहिती १ डिसेंबर रोजी दिली.
जिल्हा परिषद पदभरतीमधील घोटाळा ह्यलोकमतह्ण ने सर्वप्रथम २१ नोव्हेंबर रोजी चव्हाट्यावर आणला. त्यानंतर सातत्याने हे प्रकरण लावुन धरले. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हाधिकारी कुलकर्णी यांना ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेला ह्यफार्मासिस्टचाह्ण पेपर रद्द करावा लागला. लोकमतने एवढय़ावरच आपला लढा न थांबविता ह्यसिग्माह्ण ओएमआर एजन्सीच्या एजंटने केलेल्या उत्तर पत्रिकेमधील अफरातफरही शोधुन काढली. या सर्व घटनाक्रमाची लोकमतने अक्षरश: चिरफाड केली.
दरम्यान ह्यलोकमतनेह्ण २१ नोव्हेंबर रोजी ह्यओएमआर एजन्सी बदलामागे गौडबंगालह्ण या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाची झोप उडविली. पदभरतीमधील परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीचे कंत्राट प्रथम ह्यसिग्माह्ण या एजन्सीला देण्यात आले होते. सिग्मा एजन्सी ऐनवेळेवर बदलण्याचे मुख्य कारण ह्यबनावट उत्तरपत्रिकाह्ण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या एजन्सीच्या एजंटने एका उमेदवाराची उत्तरपत्रिकाच बनावट तयार केल्याचे निवड समितीच्या निदर्शनास आले होते. उत्तरपत्रिकेवर पर्यवेक्षक व विद्यार्थ्याची ह्यस्कॅनह्ण केलेली स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे.
सिग्मा एजन्सीच्या एजंटने अशाप्रकारचा गुन्हा केल्याचेही लोकमतने १९ नोव्हेंबर रोजीच प्रसिध्द केले होते. मात्र, एजंटने अशाप्रकारचा गोंधळ केल्याचा दुजोरा प्रशासनाच्या वतीने मिळू शकला नव्हता. सर्व अधिकार्‍यांनी त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देण्यास असर्मथतता दर्शविली होती. अखेर जिल्हाधिकार्‍यांनीच सिग्माच्या एजंटने उत्तरपत्रिकेत अफरातफर केल्याच्या कृत्याला दुजोरा दिल्याने लोकमतच्या लढय़ाला यश आले.