कंटेनर व अॅपेच्या अपघातात बापलेक जखमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:19 IST2019-03-12T18:19:49+5:302019-03-12T18:19:54+5:30
कारंजा लाड (वाशिम) - कंटेनर व अॅपेच्या अपघातात अॅपेमधील बापलेक जखमी झाल्याची घटना नागपूर ते औरंगाबाद या मार्गावरील तिरूमला हाॅटेल जवळ ११ मार्च रोजी घडली.

कंटेनर व अॅपेच्या अपघातात बापलेक जखमी !
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) - कंटेनर व अॅपेच्या अपघातात अॅपेमधील बापलेक जखमी झाल्याची घटना नागपूर ते औरंगाबाद या मार्गावरील तिरूमला हाॅटेल जवळ ११ मार्च रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार वाई येथील अंकुश शेषराव ठाकरे व शुभम अंकुश ठाकरे हे बापलेक कारंजा येथील खासगी दवाखान्यातून उपचार करून एम एच ३७ डब्ल्यु ०१३३ क्रमांकाच्या अॅपेने कारंजाहून वाईकडे जात असतांना शेलुबाजारहून कारंजाकडे येणाÚया कंटेनरने अॅपेला कट मारला. यात अॅपे तीनवेळा उलटला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र या घटनेत अंकुश ठाकरे (३०) व शुभम ठाकरे (७) हे बापलेक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कारंजा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घडताच कट मारणारा कंटेनर घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान सदर घटनेविषयी पोलिसात तक्रार केल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे.