शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गत निवडणुकीतील ११ उमेदवार पुन्हा आजमावताहेत नशीब

By admin | Updated: October 7, 2014 01:19 IST

वाशिम मतदारसंघातील तीन उमेदवारांचा समावेश.

वाशिम : सन २00९ मध्ये झालेल्या वाशिम व कारंजा विधानसभा निवडणूक व २0१४ मध्ये झालेल्या रिसोड विधानसभा पोटनिवडणुकीत लढत दिलेल्या उमेदवारांमधील ११ उमेदवार येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणार्‍या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावत आहेत. यामध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघात सहा, रिसोड विधानसभा मतदारसंघात दोन, तर वाशिम मतदारसंघातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात २00९ मध्ये असलेल्या १८ उमेदवारांपैकी सहा उमेदवार याही वेळा निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रकाश उत्तमराव डहाके, राजेंद्र सुखानंद पाटणी, उस्मान पिरू गारवे, सुभाष पंढरीनाथ ठाकरे, रमेश पांडुरंग नाखले व रामकृष्ण सावके यांचा समावेश आहे. प्रकाश डहाके २00९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात होते. यावेळी त्यांना पक्षाने ितकीट न दिल्याने ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत, तर राजेंद्र पाटणी यांनी गत निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली होती. ते यावेळी भाजपाच्यावतीने निवडणूक रिंगणात आहेत. उस्मान गारवे यांनी गत निवडणूक अपक्ष लढविली होती. ते सध्या बसपाचे उमेदवार आहेत, सुभाष ठाकरे यांनी गत निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती. यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ितकिटावर निवडणूक लढवित आहेत. रमेश नाखले व रामकृष्ण सावके यांनी गत निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती. रिसोड विधानसभा मतदारसंघात यंदाच झालेली पोटनिवडणूक अमित सुभाषराव झनक यांनी गत काँग्रेसच्यावतीने तर विजय जाधव यांनी भाजपाच्यावतीने लढविली होती. २0१४ च्या निवडणुकीतही ते त्याच पक्षातर्फे निवडणूक रिंगणात पुन्हा झुंज देण्यास उतरले आहेत. वाशिम विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीत डॉ. अल्का मकासरे, लखन मलिक व महादेव ताटके यांनी निवडणूक लढविली होती. २00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अल्का मकासरे काँग्रेसच्या उमेदवार होत्या. यावेळी त्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. लखन मलिक मागील निवडणुकीप्रमाणेच याही वेळी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. महादेव ताटके हे गत निवडणुकीप्रमाणेच यावेळीही अ पक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात आहेत.