काजळेश्वर येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:48 IST2019-05-31T16:48:19+5:302019-05-31T16:48:23+5:30
रामहरी नारायण उपाध्ये ( ६० ) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे ३१ मे रोजी आढळून आले.

काजळेश्वर येथील शेतकऱ्याची आत्महत्या
काजळेश्वर उपाध्ये : येथील अल्पभुधारक शेतकरी रामहरी नारायण उपाध्ये ( ६० ) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे ३१ मे रोजी आढळून आले.
उपाध्ये यांचा मृतदेह आप्पास्वामी मंदीराजवळील नाल्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत ३१ मे रोजी सकाळी दिसून आल्याने सदर आत्महत्या दोन दिवसापूर्वी झाली असल्याची चर्चा आहे. कारंजा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले .बँकेच्या कजार्पायी ते निराश राहत होते असे त्यांचे कुंटूबीय यांनी सांगितले. त्यांचे मागे पत्नी मुलगा भाऊ बहीन नातवंडे असा आप्तपरिवार आहे .