शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्याचे 'शाेले स्टाईल' आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 04:58 PM2021-01-30T16:58:21+5:302021-01-30T16:59:19+5:30

Washim News शेतकरी गाेपाल अंबादास ठाकरे यांनी बीएसएनल टाॅवरवर चढून ३० जानेवारी राेजी 'शाेले स्टाईल' आंदाेलन केले.

Farmers sholay style movement to repeal farmers' laws | शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्याचे 'शाेले स्टाईल' आंदाेलन

शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्याचे 'शाेले स्टाईल' आंदाेलन

Next
ठळक मुद्दे बीएसएनल टाॅवरवर चढून आंदाेलन केले.यावेळी त्यांच्यासाेबत शेतकरी रमेश उपाध्ये हाेते. त्यांची समजूत यावेळी काढण्यात आली.


वाई कारंजा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसदर्भात करण्यात आलेले कायदे शेतकरी विराेधी असल्याने ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी येथील युवा शेतकरी गाेपाल अंबादास ठाकरे यांनी बीएसएनल टाॅवरवर चढून ३० जानेवारी राेजी शाेले आंदाेलन केले.
येथील युवा शेतकरी यांनी केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकरी विराेधी आहेत. यासाठी अनेकजण आंदाेलनही करीत आहेत. परंतु शासन लक्ष देत नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाेपाल अंबादास ठाकरे या युवकाने ३० जानेवारी राेजी सकाळी ९.४५ वाजता बीएसएनल टाॅवरवर चढून आंदाेलन केले.यावेळी त्यांच्यासाेबत शेतकरी रमेश उपाध्ये हाेते. सदर बाब पाेलिसांना कळाल्यानंतर ठाणेदार यांनी गावात भेट देऊन आंदाेलकांशी चर्चा केली. त्यांची समजूत यावेळी काढण्यात आली. आंदाेलकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्याला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Farmers sholay style movement to repeal farmers' laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.