विविध मागण्यांसाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:43 IST2021-01-04T16:43:19+5:302021-01-04T16:43:36+5:30
Washim News शेतकºयांनी ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

विविध मागण्यांसाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
वाशिम : सिमेंट व गिट्टी खदानच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून नुकसानभरपाई द्यावी, शेतात जाणारे रस्ते मोकळे करावे यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिवसंग्रामी विद्यार्थी आघाडी व तरोडी, खरोडी येथील शेतकºयांनी ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
मालेगाव तालुक्यातील तरोडी व खरोडी येथील सिमेंट व स्टोन क्रशर प्लांटच्याा (गिट्टी खदान) धुळीमुळे तूर, हरभरा, करडी, गहू या पिकाचे नुकसान होत आहे. टीन लावून शेतात जाणारे रस्ते अडविण्यात आल्याने शेतात जावे कसे? असा प्रश्न शेतकºयांना पडला. गिट्टी खदान व सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींशी करार न केलेल्या शेतकºयांच्या शेतातही साहित्य टाकण्यात आल्याने नुकसान होत असल्याचे शेतकºयांनी निवेदनात नमूद केले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि गिट्टी खदान परिसरातील ५०० मीटर अंतरातील शेतकºयांना प्रतिवर्षी भरपाई द्यावी, अडविलेले रस्ते मोकळे करावे, शेतातील साहित्य उचलून न्यावे आदी मागण्या शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख यांच्यासह शेतकरी गजानन भिलंग, कुंडलिक भिलंग, संजय काटे, प्रकाश काटे, भागवत काटे, विनोद काटे, धोंडबाराव वाघ, सुभाषराव वाघ, अनिल देशमुख, दत्तराव देशमुख, निळकंठ देशमुख २५ शेतकºयांनी केल्या. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला.