वाशिमच्या जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 16:58 IST2019-01-01T16:58:11+5:302019-01-01T16:58:40+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकºयांनी मंगळवार, १ जानेवारीला धरणे आंदोलन केले.

वाशिमच्या जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुका खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावे. यासह अपहार आणि फसवणूकप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य लोकांची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकºयांनी मंगळवार, १ जानेवारीला धरणे आंदोलन केले.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की शेतमाल खरेदी आणि विक्री प्रकरणात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांत १८ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये संचालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि प्रशासक, ज्यांना माल विकल्या गेला ते व्यापारी व त्यांना पाठीशी घालणारे राजकीय पुढाकारी यांची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करावी व दोन्ही संस्था तत्काळ बरखास्त कराव्या. त्याठिकाणी प्रशासक नेमून शेतकºयांच्या धान्याचे पैसे व्याजासहित २५ जानेवारीपुर्वी अदा करावे; अन्यथा २६ जानेवारी शासनाचा निषेध म्हणून झेंडावंदन होवू देणार नाही, असा इशारा आंदोलक शेतकºयांनी दिला आहे. या आंदोलनात सुभाष देव्हढे, माधव ठाकरे, दिलीप चौहान, मदन शिंदे, श्रीकृष्ण राऊत, नारायण विभुते, संतोष लबडे, नंधमल मंत्री, सविता मंत्री, जयसिंगराव मंत्री, अनिल पवार, सखाराम वाघ, राजू बुंधे, सुभाष सरनाईक, कैलास राऊत, राम भोयर आदिंसह शेकडो शेतकºयांनी सहभाग नोंदविला.