शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:25 IST2019-03-15T16:25:20+5:302019-03-15T16:25:35+5:30
शेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे.

शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे. या पाणवठ्यात विहिरीतील पाणी सोडून ते वन्यप्राण्यांसह गुरांची तहान भागवित आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी, पक्षी तसेच मोकाट जनावरांची पाण्यासाठी सतत भटकंती होत असते. पाण्यासाठी वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेतात. त्यामुळे अनेकदा मानव-वन्यप्राणी संघर्ष घडून वन्यप्राण्यांना जीव गमावावा लागतो. मंगरुळपीर तालुक्यातील येडशी परिसरात मोठे जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यासांठी पाण्याची सोय नसल्याने ते शेतशिवारासह गावाकडे धाव घेत आहेत. त्याशिवाय गुरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या वनोजा शाखेचे सदस्य आदित्य इंगोले यांनी येडशी शिवारात त्यांच्या शेतानजिक असलेल्या शेतकऱ्याला वन्यप्राण्यांकरीता पाणवठा तयार करावा, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार सदर शेतकºयाने शेताजवळ मोकळ्या जागेत खड्डा खोदून पाणवठा तयार केला आणि या पाणवठ्यात ते त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीचे पाणी सोडून वन्यप्राण्यांसह गुरांची तहान भागवित आहेत.