शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:01 PM2020-07-26T16:01:27+5:302020-07-26T16:01:35+5:30

तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही.

Farmers continue to wait for incentive grants! | शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम; राज्य शासनाने शेतकºयांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रूपयांपर्यतची कर्जमाफी दिली, तर नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदानही देण़्याची घोषणा केली; परंतू, तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे नि़यमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रतिक्षा आहे.
महाविकास आघाडी शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले पीककर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या लाभाची रक्कम अदा करण्यासह नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांनी २०१७ ते २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकºयांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेवर जास्तीतजास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आली होती; परंतु अद्याप या घोषणेची अमलबजावणी सुरू झालेली नाही आणि प्रशासनाला पात्र ठरणाºया शेतकºयांची यादी तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
------------------.
दोन लाखांवरील कर्जदार शेतकºयांनाही दिलासा नाही
महाविकास आघाडी सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान अशा दोन योजनांसह तिसरी योजनाही जाहीर केली होती. त्यात २ लाखांवर कर्ज थकबाकी असलेल्यांनाही २ लाखांपर्यंत माफी देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी २ लाखांवर कर्ज थकित असलेल्या शेतकºयांना थकबाकी रक्कम आधी कर्जखात्यात भरावी लागणार होती. अद्याप या योजनेचा शासन आदेशही प्रतीक्षेत आहे.
 
  नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत, तसेच २ लाखांवरील थकीत कर्जदार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबतचा आदेश किंवा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. असा शासन निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थींची यादी तयार करून अमलबजावणी करण्यात येईल.
-रवि गडेकर,
जिल्हा उपनिबंधक, वाशिम
 
 राज्यशासनाने नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची, तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांनाही २ लार्खांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणाही केली होती. शासनाने घोषणेनुसार अमलबजावणी तातडीने करावी, अशी ंअपेक्षा आहे.
- नितिन पाटील उपाध्ये,
शेतकरी, तथा ग्रा.पं. सदस्य
काजळेश्वर ता. कारंजा. जि. वाशिम

Web Title: Farmers continue to wait for incentive grants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.